राज्यात ९,६०१ नवीन कोरोना रुग्ण, ३२२ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात ९,६०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,३१,७१९ झाली आहे. राज्यात १,४९,२१४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात शनिवारी ३२२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या १५ हजार ३१६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर ३.५५ % एवढा आहे. 

राज्यात शनिवारी ३२२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत ४५, ठाणे १९, नवी मुंबई ८, वसई विरार मनपा १२, रायगड २६, नाशिक १२, जळगाव २०, पुणे ६३, पिंपरी चिंचवड मनपा १३, अन्य राज्य १ यांचा समावेश आहे. राज्यात १०७२५ रुग्ण बरे होऊन घरी,राज्यात आजपर्यंत एकूण २,६६,८८३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.८२ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २१,९४,९४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,३१,७१९ (१९.६६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,०८,०९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,९४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.