राज्यात दिवसभरात ९८५ जणांचा कोरोनाने घेतला बळी, ६३,३०९ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज ९८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची(corona death in maharashtra) नोंद करण्यात आली.आज राज्यात ६३,३०९ नवीन कोरोना रुग्णांची(corona update)नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित(corona patients in maharashtra) रुग्णांची एकूण संख्या ४४,७३,३९४ झाली आहे.

  मुंबई: महाराष्ट्रात(corona patients in maharashtra) कोरोनाचे थैमान अजुनही सुरुच आहे. राज्यात विविध शहरांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात आज ९८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली.

  आज राज्यात ६३,३०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४४,७३,३९४ झाली आहे. आज ६१,१८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३७,३०,७२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४% एवढे झाले आहे.

  आज नोंद झालेल्या एकूण ९८५ मृत्यूंपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३४२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३४२ मृत्यू, पुणे-८२, औरंगाबाद-८०, ठाणे-५३, नंदूरबार-३७, नागपूर-२३, , नाशिक-१७, यवतमाळ-१४, वाशिम-९, हिंगोली-७, जळगाव-४, धुळे-३, , परभणी-३, रायगड-३, अहमदनगर-२, जालना-२, सांगली-२ आणि सोलापूर-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

  तसेच आज राज्यातील कोविड १९ मृत्यूच्या आकडेवारीचे  २३ एप्रिल २०२१ पर्यंतचे रिकन्सिलिएशन पूर्ण करण्यात आले आहे. या प्रक्रियेमध्ये काही जिल्ह्यांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्याने राज्याच्या मृत रुग्णाच्या प्रगतीपर आकडेवारीत ५० ने वाढ झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे.

  राज्यात आज रोजी एकूण ६,७३,४८१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६५,२७,८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४,७३,३९४ (१६.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण ६,४३,४८१ आहेत.

  मुंबईत दिवसभरात ४९२६ रुग्णांची नोंद
  मुंबईत दिवसभरात ४९२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आत्तापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ६४०४०९ एवढी झाली आहे. तर आज ७८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आत्तापर्यंत १२९५४ मृत्यूची नोंद करण्यात आली.