मुरबाडमधील महिला बेपत्ता

मुरबाड: मुरबाडमधील तोंडलीकर नगर  येथील एक २७ वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मुरबाड पोलीसांकडून तपास सुरू आहे. 

मुरबाड शहरातील तोंडलीकर नगर येथील मनिषा पवार ही २७  वर्षीय महिला ८ ऑगस्ट  रोजी सकाळी आपल्या राहत्या  घरातून निघून  गेली असता ती पुन्हा घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. याबाबत कुणाला काही माहीती असल्यास त्यांनी मुरबाड पोलीसांशी ०२५२४२२२२३३ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मुरबाड पोलीसांनी केले आहे