श्रीवर्धन बोर्लीपंचतन मार्गावर पल्सर व एसटीची धडक

श्रीवर्धन: श्रीवर्धन(shreewardhan) चिखलप मार्गे बोर्लीपंचतन मार्गावर खेर्डी गावाच्या हद्दीमध्ये सपाट रस्त्यावर एक पल्सर दुचाकीस्वार बोर्लीपंचतनकडून श्रीवर्धनकडे येणाऱ्या एसटी बसवर(st bus) धडकल्याने गंभीर जखमी(injured) झाला आहे. हा दुचाकीस्वार हा श्रीवर्धन कडून बोर्लीपंचतनकडे जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या तरुणाचे नाव अद्याप माहिती झालेले नाही. या जखमी तरुणाला पोलिसांनी रुग्णवाहिकेत घालून श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र अपघाताचे स्वरूप एवढे गंभीर आहे की एसटीच्या ड्रायव्हर साईडचा पत्रा व गार्ड पूर्णपणे वाकुन गेला असून पल्सरचा चुरा झाला आहे.