मुंबई- नाशिक महामार्गावर अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू

भिवंडी: मुंबई – नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून कल्याण,अटाळीगाव  येथील घरी जात असताना दुचाकीस्वाराचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने दुचाकी डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला साथीदार गंभीर जखमी झाल्याची घटना हायवेदिवा येथे गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अजय पाटील असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव असून ललित पाटील असे गंभीर जखमी झालेल्या साथीदाराचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा मृत अजय याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पराग भाट करीत आहेत.