central railway

राज्यात आता आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास(e-pass) सक्ती रद्द करण्यात आली आहे. ही घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही(central railway) राज्यांतर्गत प्रवासी वाहतूकीला परवानगी दिली आहे.राज्यातंर्गत रेल्वे बुकींग(railway booking) २ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे, असे मध्य रेल्वेने सांगितले आहे.तसे पत्रक काढण्यात आले आहे.

मार्च महिन्यापासून रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. फक्त विशेष श्रमिक ट्रेन्स आणि मुंबईत अत्यावश्यक सेवेमध्ये असणाऱ्यांसाठी काही विशेष लोकल सुरु होत्या. मात्र आता आंतरजिल्हा रेल्वे वाहतूकही करता येणार असल्याचे संकेत मध्य रेल्वेने दिले आहेत. राज्य सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई पासची सक्ती रद्द केल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. आरक्षण करून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे मध्य रेल्वेने आपल्या पत्रकामध्ये म्हटले आहे. सगळ्या प्रवाशांना २ सप्टेंबर २०२० पासून रेल्वे तिकीट बुकींग करता येणार आहे.

केंद्र सरकारने आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासावरील निर्बंध उठवण्याची सूचना राज्यांना केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ई पास सक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लोकांची ई-पासची चिंता संपली आहे. दरम्यान राज्यात मेट्रो सेवा ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.