वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले….

शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांची बायको वर्षा राऊत(ed notice to varsha raut) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(aditya thakre reaction) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांची बायको वर्षा राऊत(ed notice to varsha raut) यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(aditya thakre reaction) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. यावरून ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्ररित असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, “हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी अशा कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.”

मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

संजय राऊत यांनी असे म्हटले आहे की,“मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. त्यांनीच मला ईडीची नोटीस आल्याचं सांगितले आहे. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ.

“हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.