कंगनाच्या वक्तव्यानंतर पाचाडमध्ये जोडे मारो आंदोलन

महाड : कंगनाच्या(kangana) मुंबई विरोधातील वक्तव्यावरून वातावरण पेटले आहे. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर कंगनावर सर्व माध्यमातून टीकेचा भडिमार सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यानंतर शिवसेना(shivsena) आक्रमक झाली आहे. शिवसेना वाळण (रायगड विभाग) महिला आघाडी आणि शिवसेना नेते रघुवीर देशमुख यांनी पाचाड येथे जोडे मारो आंदोलन(protest) करून निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी विभागप्रमुख लहू औकिरकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य माधवी रघुवीर देशमुख, सावरट सरपंच सौ पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य गणेश औकिरकर, माजी सरपंच देविदास गायकवाड, जयेश लामजे, संदीप ढवळे, बबन गायकवाड विभागातील आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईचे स्थिती पाकव्याप्त काश्मीर सारखी झाल्याच वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केलं होतं. काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने मला मूवी माफिय पेक्षा मुंबई पोलिसांची अधिक भीती वाटत असल्याचं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. शिवसेना वाळण रायगड विभाग तसेच महिला आघाडीच्यावतीने पाचाड येथे मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या आणि मुंबईची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला.