vijay wadettiwar

महाराष्ट्रात कोरोनाचे(corona in maharashtra) रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही नवे निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा सुरु आहे.  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(vijay wadettiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे.

    महाराष्ट्रात कोरोनाचे(corona in maharashtra) रुग्ण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा काही नवे निर्बंध लागू करण्याबाबत चर्चा सुरु आहे.  राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(vijay wadettiwar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाची लस आली  तरी कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

    विजय वडेट्टीवार म्हणाले, “कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. मुंबईत लोकल पूर्णपणे बंद न करता गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्यांचं नवीन वेळापत्रक तयार होण्याची शक्यता आहे. तसेच बसेसमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय घेण्यात येईल.

    वडेट्टीवार यांनी पुढे सांगितले की, नुकताच तामिळनाडू सरकारने नववी, दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच सहामाही आणि तिमाही परीक्षांच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधारावर महाराष्ट्रात देखील तसं काही करता येईल का याबाबत विचार सुरु आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेता येतील का? यावर देखील विचार सुरू आहे.

    मंगल कार्यालयातील निर्बंधाबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले,  गेल्या काही दिवसांपासून सामान्य जनतेपासून राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींच्या लग्नकार्यांमध्येसुद्धा गर्दी होत आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे, त्यावर लक्ष ठेवणे इत्यादी गोष्टी केल्या जातील.