क्षुल्लक वादातून नणंदेचा भावजयेवर चाकूहल्ला, गुन्हा दाखल

भिवंडी: चहा बनवण्याच्या क्षुल्लक वादातून नणंद-भावजयमध्ये बाचाबाची होऊन नणंदेने भावजयीवर चाकूने वार केल्याची घटना दर्गारोड येथे घडली आहे. या चाकू हल्ल्याप्रकरणी नणंदेविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

अनम  अन्सारी असे गुन्हा दाखल झालेल्या नणंदेचे नाव आहे .भावजय सगुफ्ता अन्सारी हिला तिच्या आईने चहा बनवण्यास सांगितल्याने सगुफ्ता ही किचनमध्ये चहा बनवण्यास गेली त्यावेळी अनमने त्या ठिकाणी जाऊन ‘ मेरे को चाय बनानी है ‘ असे सांगितले. तेव्हा सगुफ्ता अनमला ‘माँ को चाय देनी है ‘ असे बोलली. या  गोष्टीचा मनात राग धरून अनमने सगुफ्ताचे केस पकडून तिला शिवीगाळ करत चाकूने तिच्या डोक्यात वरच्या बाजूस वार करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेचा पुढील तपास भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर.एस.लोमटे करीत आहेत.