शेलार -बोरपाडा पंचायत समिती उपविभाग मनसे अध्यक्षपदी अक्षय जाधव यांची निवड

भिवंडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेना(maharashtra navnirman sena) भिवंडी ग्रामीणच्या शेलार बोरपडा गटासाठी उपविभाग अध्यक्षपदी अक्षय जाधव(akshay jadhav) यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष साळवी व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी ग्रामीणचे तालुका अध्यक्ष परेश चौधरी यांनी जाधव यांना निवडीचे पत्र(selection letter) दिले.  पंचायत समिती गटात मनसेने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न केल्याने मनसे गटात आनंदाचे वातावरण पसरले असून येत्या काळात हा गट मनसेमय होईल,असा विश्वास अक्षय जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी मनसे भिवंडी ग्रामीणचे विभाग अध्यक्ष  गिरीश देव यांनी जाधव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.