आंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, सुधागडमध्ये मुसळधार पाऊस

महिनाभर दडी मारलेल्या पावसाने सुधागड तालुक्यात पाणीच पाणी केले आहे. काल दुपारपासून पावसाची सतंतधार सुरूच आहे. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. सुधागडातील आंबा नदीवरील पाली पूल,जांभूळपाडा नदीवरील पूल,खुरावले नदीवरील पूल हे पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले आहेत.

पाली :  रायगड जिल्ह्यामध्ये काल दुपारपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. महिनाभर दडी मारलेल्या पावसाने आता सुधागड तालुक्यात पाणीच पाणी केले आहे. काल दुपारपासून पावसाची सतंतधार सुरूच आहे. त्यामुळे नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. सुधागडातील आंबा नदीवरील पाली पूल,जांभूळपाडा नदीवरील पूल,खुरावले नदीवरील पूल हे पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या दोन तीन दिवस अतिवृष्टीच्या इशाऱ्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून तालुका प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार तालुका प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याचे तसेच गरज नसल्यास बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून, वाहतूक ठप्प झाली आहे. बऱ्याचशा सखल भागात पाणी साचले आहे.पुरामुळे भेरव आंबा नदीच्या,पाली आंबा नदीच्या दोन्ही बाजूला नागरिक अडकून पडले आहेत.सगळीकडे चहूबाजूला पाणीच पाणी झाले असून शेतीदेखील पाण्याखाली गेली आहे.