सराईत बाईक चोराला अँटी रॉबरी सेलने केली अटक

कल्याण : कल्याणजवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत राहणाऱ्या बाईक चोराला कल्याण परिमंडळ ३ च्याअँटी रॉबरी सेलने अटक केली आहे. हैदर इराणी असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीकडून ४ लाख १५ हजार किमतीच्या ८ बाईक व १ मोबाईल हस्तगत करण्यात आला असून आयुक्तालयातील एकूण ९ गुन्हे उघड केले आहेत.

या आरोपीकडून शांतीनगर पोलीस स्टेशन, खडकपाडा पोलीस स्टेशन. मुंब्रा पोलीस स्टेशन, पंतनगर पोलीस स्टेशन, घाटकोपर पोलीस स्टेशन, उल्हासनगर पोलीस स्टेशन, कोळशेवाडी पोलीस स्टेशन, कल्याण तालुका पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. हा आरोपी हा सराईत चैन स्नॅचर असून त्याच्यावर यापूर्वी नाशिक, पुणे, ठाणे येथे १४ जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे यांनी दिली.