लष्करी अधिकाऱ्याकडून घृणास्पद प्रकार, मित्राला बेशुद्ध करुन त्याच्या पत्नीवर बलात्कार

कानपूरमधील एका लष्करी अधिकाऱ्याविरोधात मित्राच्या पत्नीवर बलात्कार(rape on friend`s wife) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

कानपूरमधील एका लष्करी अधिकाऱ्याविरोधात मित्राच्या पत्नीवर बलात्कार(rape on friend`s wife) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे. कर्नल असलेल्या या अधिकाऱ्याने मित्राच्या रशियन पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. महिलेच्या पतीने कॅन्टोनमेंट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याची रशियन पत्नी गेल्या १० वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे.

पोलीस अधीक्षक राज कुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, कर्नलने मला आणि पत्नीला बढती मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी शनिवारी त्याच्या घरी बोलावलं होतं अशी माहिती तक्रारदाराने दिली. याप्रकरणी तपास सुरु  असून कर्नलवर कारवाईची तयारी सुरु आहे.

घरी बोलावल्यानंर दिलेल्या पेयानंतर शुद्ध हरपली होती. याचा फायदा घेत त्याने आपल्या पत्नीवर बलात्कार केला असा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय पीडितेने विरोध केला असता मारहाण केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.