हॉटेलमध्ये शिरून चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

भिवंडी: शहरातील रांजणोली बायपास नाक्याजवळ असलेल्या के.एन.पार्क हॉटेलचे शटर उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने रंगेहात पकडून कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

या चोरीप्रकरणी कोनगाव पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.समसुद्दीन शेख असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.या घटनेचा पुढील तपास कोनगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र सूर्यवंशी करीत आहेत.