crime

भिवंडी : भिवंडी(bhivandi) शहरातील नवीबस्ती येथील सद्दाम हुसेन अत्तार अली शेख याला त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलीस उपायुक्तांनी १ ऑक्टोबर २०१९ रोजी ठाणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. हा आरोपी हद्दपारी आदेशाचा भंग करून भिवंडी शहरातील नवीबस्ती नेहरूनगर येथील हनुमान मंदिर परिसरात आढळून आल्यानंतर त्याला शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन  पोलीस नाईक किरण जाधव यांनी याविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम १४२  प्रमाणे गुन्हा दाखल करीत अटक(arrest) केली आहे .