या दिवशी होणार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी, अशोक चव्हाणांनी केले ट्विट

मराठा आरक्षणाबाबत(maratha reservation) महत्त्वाची माहिती मंत्री अशोक चव्हाण(ashok chavhan) यांनी दिली आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी(maratha reservation case hearing in supreme court) होणार आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत(maratha reservation) महत्त्वाची माहिती मंत्री अशोक चव्हाण(ashok chavhan) यांनी दिली आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी(maratha reservation case hearing in supreme court) होणार आहे. ही सुनावणी पाच सदस्यीय घटनापीठापुढे  होणार आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ही सुनावणी होणार आहे.


मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने यासाठी ४ वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता. त्यानंतर ही सुनावणी होत आहे. अंतरिम स्थगितीनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर पोलीस मेगाभरतीसह तलाठीपदाच्या नियुक्त्या देखील रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.