महाडमधील बचावकार्यासाठी आठवलेंनी केले एनडीआरएफ आणि प्रशासनाचे कौतुक

मुंबई: रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये(mahad) तारिक गार्डन(tarique garden) ही इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. मात्र इमारत कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर तातडीने रायगड जिल्हा प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफ टीमने(NDRF) समन्वय करुन उत्कृष्टपणे बचावकार्य केले. मदतकार्य केले. त्यात अनेक रहिवाशांचे जीव वाचविण्यात आल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले(ramdas athavale) यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी पांडे आणि सर्व प्रशासनाचे अभिनंदन केले.

महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्याची रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. त्यावेळी बचावकार्य चांगले केल्याबद्दल एनडीआरएफ आणि जिल्हाधिकारी निधी पांडे यांचे रामदास आठवले यांनी कौतुक केले.
तारिक गार्डन या इमारतीचे बांधकाम निकृष्ट होते. त्यामुळे ती इमारत कोसळली. इमारत हलू लागताच इमारतीतील रहिवासी बाहेर पडले अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती तरी अद्याप या दुर्घटनेत १४ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक जण जखमी आहेत. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सांत्वनपर किमान १० लाखांची मदत करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.