पादचारी महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला

भिवंडी: भाजी मार्केटमधून भाजी घेऊन घरी जाणाऱ्या महिलेस(woman) दोन अज्ञात इसमांनी रस्त्यात अडवून धमकी देत धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला(attack) केल्याची घटना ठाणगे आळी येथे बुधवारी दुपारी घडली आहे.या हल्ल्याप्रकरणी दोघा अज्ञातांवर निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा(crime) दाखल करण्यात आला आहे.

रंजिता बोल्लू ही महिला भाजी घेऊन घरी जात होती. त्यावेळी ठाणगे आळी येथील गल्लीतून जात असताना दोन अज्ञातांनी तिला रस्त्यात अडवून तुमचे कासारआळी येथे असलेले पेंटिंगचे दुकान तुझ्या नवऱ्याला सोडून द्यायला सांग नाहीतर अजून जास्त त्रास होईल अशी धमकी देत धारदार शस्त्राने तिच्या पाठीवर, उजव्या बाजूस व डाव्या हाताच्या दंडापासून मनगटापर्यंत वार करून गंभीर जखमी केले आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या रंजीता हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेचा पुढील तपास निजामपूरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करीत आहेत.