atul bhatkhalkar

मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करत ‘स्वतंत्र काश्मीर’ची(demand of free kashmir) मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. या वादात काश्मीरबद्दलचा तो फलक हातात घेऊन उभी असणाऱ्या तरूणीविरोधातील तक्रार मागे घेण्यात आली आहे. या मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर(atul bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर टीका केली.

सीएएचा(CAA) कायदा भारतात लागू झाल्यानंतर दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात हिंसाचाराची घटना घटली. त्यानंतर मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वर आंदोलन करत ‘स्वतंत्र काश्मीर’ची(demand of free kashmir) मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. या वादात काश्मीरबद्दलचा तो फलक हातात घेऊन उभी असणाऱ्या तरूणीविरोधातील तक्रार मागे घेण्यात आली आहे. महेक मिर्झा प्रभू असं या तरूणीचं नाव असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होता, पण मंगळवारी मुंबई पोलिसांनी ही तक्रार मागे घेतली. या मुद्द्यावरून भाजपाचे अतुल भातखळकर(atul bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर टीका केली.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयुतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात ‘काश्मीर मुक्त करा’चे फलक होते, त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा”.