Balasaheb-Thorat

बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा(journalists should be included in front line workers category) देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे.

    सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा(frontline Workers category for journalitst)  देऊन त्यांचं तातडीने लसीकरण करण्यात यावं,अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. थोरात(Balasaheb Thorat Letter to Chief Minister) यांनी यासंदर्भातलं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.

    थोरात यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पत्रकार हे सातत्याने बातमीदारीच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याचा धोका आहे. या सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे. तसेच मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात थोरात यांनी अन्य काही राज्यांचे दाखलेही दिले आहेत. तामिळनाडू, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही याबाबतचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे.