वांद्रे-अमृतसर एक्सप्रेसची ट्रकला धडक

मुंबई,

वांद्रे-अमृतसर एक्सप्रेसची (Bandra-Amritsar Express) ट्रकला धडक बसल्याने अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला असून सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही.  याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

आज दुपारी साडे बाराच्या सुमारास कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. कांदिवली रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे लाइनचे काम सुरू आहे. या कामासाठी ट्रकमधून माल वाहून आणला जातो. रेल्वे लाइनच्या कामासाठी माल घेऊन आलेला एक ट्रक रेल्वे रुळावर आला होता. तेवढ्यात समोरून आलेल्या वांद्रे-अमृतसर एक्सप्रेसने या ट्रकच्या  मागच्या बाजूला धडक दिली. त्यामुळे हा ट्रक फरफटत दुभाजकाच्या बॅरिकेड्स तोडून रस्त्याच्या दिशेने पुढे गेला.