मंदिरे खुली करण्यासाठी महाडमध्ये भाजपचे घंटानाद आंदोलन

महाड : राज्यातील मंदिरांसह(temples) सर्व प्रार्थानस्थळे पुन्हा खुली करावीत,अशी मागणी होत असतानाही राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आज भाजपाच्या(bjp) वतीने मंदिरात घंटानाद आंदोलन(bell ringing protest) करण्यात आले. महाडमध्येदेखील घंटानाद आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर देशातील बहुतांश मंदिरे खुली करण्यात आली आहेत. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून ठाकरे सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्यास विरोध दर्शविला आहे.‌ या विरोधात सरकारचे डोळे उघडण्यासाठी महाड येथे भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कोहीनूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात गणेशाच्या समोर घंटा वाजवून ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर(bipin mahamunkar), युवामंच अध्यक्ष अक्षय ताडफळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदिप ठोंबरे, जिल्हा चिटणीस मंजुशा कुद्रीमोती, उप तालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, गणेश शिर्के, सोशल मिडीया सेलच्या श्वेता ताडफळे, कोमल शेठ, शंकर महाडीक आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.