मंदिरे खुली करण्यासाठी नागोठण्यात भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन

नागोठणे : देशातील अन्य राज्यात मंदिरे खुली झाली असूनही महाराष्ट्रातील मंदिरे(temples) मात्र बंद आहेत.  त्यामुळे आपल्या राज्यात देवाचं दर्शन घेऊ न देणाऱ्या महाविकास आघाडी(mahawikas aghadi) सरकारचा निषेध करण्यासाठी नागोठण्याची ग्रामदेवता जोगेश्वरी माता मंदिरात घंटा वाजवून, आरती करून भाजपचे कार्यकर्ते व गुरव समाजाच्या वतीने आज सकाळी ११ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष नामदेव वाघमारे, शहर अध्यक्ष सचिन मोदी, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश जैन, ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य संतोष लाड, अल्पसंख्यांक सेलचे रोहा तालुका अध्यक्ष रऊफ कडवेकर, अंकुश सुटे, विभागीय सरचिटणीस विठोबा माळी, ज्ञानेश्वर शिर्के, तिरतराव पोलसानी, ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. मनिषा कुंटे, गुरव समाज विभागीय अध्यक्ष गोपाळ खंडागळे,  गुरव समाज महिला जिल्हा अध्यक्षा अनिता अरुण गुरव, भाजपा शहर अध्यक्षा श्रेया केदार कुंटे, रेखा प्रल्हाद गुरव, अॅड. प्रिया संतोष गुरव, माधुरी संजय बागुल आदींसह भाजपाचे कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत यावेळी उपस्थित होते. दरम्यान या घंटानाद आंदोलनाच्या प्रसंगी नागोठणे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी स्वतः उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.