भिवंडीतील विविध मंदिरांबाहेर भाजपचे घंटानाद आंदोलन  

भिवंडी : कोरोना संसर्गाचा प्रकोप वाढत असताना लॉकडाऊन काळात संपूर्ण देशभरातील मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च बौद्ध विहार नागरीकांसाठी बंद करून तेथे सार्वजनिक पूजाअर्चा करण्यास बंदी घालण्यात आली. त्यानंतर एका पाठोपाठ तीन महिन्यात तीन अनलॉक काळात अनेक उद्योग व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली.मद्यविक्री सुरू झाली मात्र मंदिर मशीद उघडण्यास बंदी कायम ठेवल्याने भारतीय जनता पार्टी वतीने शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागातील  तब्बल ३१ मंदिरांबाहेर पदाधिकारी कार्यकर्ते यांनी घंटानाद करीत आंदोलन केले .

केंद्र सरकाच्या मर्गदर्शने राज्य सरकारने(state government) राज्यात मद्य विक्रीला परवानगी देते मॉल उघडायला परवानगी दिली. मात्र कोट्यवधी जनतेची आस्था असणारे मंदिर उघडण्यास परवानगी देत नाही त्याचा आम्ही धिक्कार करीत असून या बाबत निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन करून भक्तांसाठी मंदिर उघडे करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ मग जेल झाली तरी बेहत्तर असा इशारा संतोष शेट्टी यांनी दिला. मंदिरे ही सकारात्मक ऊर्जा देणारी आस्थेची ठिकाणे असून शासन विविध उद्योग व्यवसायांना काही अटींवर सुरू करण्यास परवानगी देते तर मग सामाजिक अंतर बाळगत ,आरोग्याची काळजी घेत मंदिर उघडण्यास परवानगी का देत नाही, असा सवाल अय्यपा मंदिराचे पुजारी सतीश भट यांनी उपस्थित केला.

भाजपा(bjp) शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी स्वामी अय्यपा मंदिराबाहेर टाळ वाजवीत भजन करीत मंदिर उघडण्याची मागणी केली. या आंदोलनात कार्यकर्त्यांसह मंदिर विश्वस्त पुजारी हेसुध्दा सहभागी झाले होते . नगरसेवक निलेश चौधरी यांनी राजाराम मंदिरा बाहेर आंदोलन केले. त्यासोबतच असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गणपती मंदिर ,स्वामी नारायण मंदिर , जैन मंदिर ,मार्कंडेय महामुनी मंदिर , नीलकंठ मंदिर , साईबाबा मंदिर या ठिकाणी आंदोलन करण्यात आले .