भाई जगताप यांनी मांडला कंगना विरोधात हक्कभंग प्रस्ताव

अभिनेत्री कंगना राणौत विरोधात विधान परिषदेमध्ये आज हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते तसेच विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी सभागृहामध्ये हा प्रस्ताव सादर केला. आधी शिवसेनेने रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहामध्ये गोंधळ घातला. त्यामुळे काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला.

हा हक्कभंग फक्त हक्कभंग नाही तर मुंबई आणि महाराष्ट्राशी कंगनाने केलेली गद्दारी आहे. अध्ययन सुमन याने कंगना २०१६ मध्ये आपल्याला कोकेन घ्यायला सांगत होती, असे सांगितले आहे. अशी महिला मुंबईबद्दल बोलते म्हणून हक्कभंग आवश्यक आहे. याविषयी सर्व पुरावे असल्याचेही जगताप यांनी सांगितले.