भिवंडी पालिकेचे भाजी मार्केट बनले जुगाराचा अड्डा

भिवंडी: भिवंडी (bhivandi) शहरात व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठया प्रमाणात जुगार, मटका अड्डे सुरू आहेत. ते त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना आमदार शांताराम मोरे यांनी केली होती. मात्र या मागणीनंतर अनेक जुगार मटका चालवण्याऱ्यांनी जागा शिफ्ट करून अन्य ठिकाणी आपले अवैध धंदे इतरत्र हलविले. काही मटका किंग यांनी पालिकेच्या बंद असलेल्या वास्तूमध्ये मटका जुगारा सुरू केले असून यांच्याकडून हप्ते वसूल करण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पोलीस(police) हप्ते वसूल करण्यासाठी रांगा लावत असल्याचे चित्र दिसत आहेत.

भिवंडी शहरातील शिवाजी चौक येथे पालिकेने लाखो रुपये खर्च करून फेरीवाल्यांसाठी भाजी मार्केट बांधून दहा वर्षे झाली आहेत. मात्र या भाजी मार्केटमध्ये दारुडे , चारसी , जुगार , मटका असे अवैध अड्डे सुरू आहेत. मात्र या अवैध अड्ड्यांना स्थानिक पोलिसांचे अभय असल्याने स्थानिक नागरिक हवालदिल झाले असून याबाबत पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही ते बंद केले जात नसल्याने परिसरातील महिला हे अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे मोर्चा नेणार असल्याचे समजते.