भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेतर्फे रक्तदान शिबीर संपन्न

भिवंडी: सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेने ग्रामपंचायत कार्यालय शेलार येथे नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष साईनाथ पाटील यांच्या संकल्पनेने व भिवंडी तालुका अध्यक्ष सोमनाथ ठाकरे यांच्या सहकार्याने भिवंडीतील पोलीस पाटलांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरामध्ये भिवंडीतील पोलीस पाटील तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व स्थानिक तरुणांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सकाळपासून सुरू झालेल्या रक्तदानाला चांगलाच प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र दिसून आले. सोशल डिस्टन्सिंग राखून रक्तदान करण्यात आले. यामध्ये रक्तदान केलेल्या रक्तदाते साईनाथ पाटील पोलीस पाटील सावंदे (ठाणे जिल्हा अध्यक्ष) ,सोमनाथ ठाकरे पोलीस पाटील ठाकूर पाडा- (भिवंडी तालुका अध्यक्ष), सुधाकर पाटील पोलीस पाटील मानिवली (भिवंडी तालुका सचिव), किशोर बजागे पोलीस पाटील  किरवली (भिवंडी तालुका खजिनदार), श्रीराम पाटील पोलीस पाटील घोलगाव, गजानन पाटील आदींसह नागरिक व पोलीस जवानांनी रक्तदानासाठी सज्ज होऊन रक्तदान केले. यावेळी ९० रक्तदात्यांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.तालुक्यातील पोलीस पाटलांनी रक्तदानाच्या इतिहासात ‘पोलीस पाटलांचे नाव करूया’  ही चांगलीच संकल्पना रुजवल्याने तालुक्यातून या संघटनेचे कौतुक होत आहे.