त्या पोलीस कॉन्स्टेबलला बायकोने दिली धमकी, म्हणाली भावाच्या लग्नात आला नाहीत तर…

लग्नासाठी रजा मिळावी म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने एक अर्ज केला आहे.(leave application of police constable viral) जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या अर्जामध्ये त्यांनी बायकोने दिलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे.

भोपाळ : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. नातेवाईक आणि मित्रांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. लग्नासाठी रजा मिळावी म्हणून एका पोलीस कॉन्स्टेबलने एक अर्ज(leave application of police constable viral) केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या अर्जामध्ये त्यांनी बायकोने दिलेल्या धमकीचा उल्लेख केला आहे.

leave application

दिलीप कुमार आहिरवार असे काॅन्स्टेबलचे नाव आहे. तो भोपाळ शहरात ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबल आहेत. दिलीप कुमार यांच्या मेहुण्याचे ११ डिसेंबरला लग्न आहे. या लग्नासाठी पाच दिवसांची रजा मिळावी म्हणून त्यांनी वरिष्ठांकडे अर्ज केला होता.

या अर्जामध्ये त्यांनी लिहीले आहे की, ‘मी भोपाळमधील वाहतूक विभागात काम करत असून माझ्या सख्ख्या मेहुण्याचे ११ डिसेंबर रोजी लग्न आहे. त्या लग्नाला उपस्थित राहणं माझ्यासाठी आवश्यक आहे. कृपया यासाठी मला पाच दिवसांची रजा मंजूर करावी’.

या रजेच्या अर्जात त्याने जी नोट लिहीली आहे त्यामुळे त्याचा अर्ज व्हायरल झाला आहे. ‘भावाच्या लग्नात आला नाहीत तर परिणाम चांगला होणार नाही, असे अर्जदाराच्या पत्नीने स्पष्ट केल्याचे पोलीस कॉन्स्टेबलने आपल्या अर्जात म्हटले आहे.

शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी देशव्यापी बंद देखील पुकारला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील पोलिसांना सध्या अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टमुळे सुट्टी मिळायला अडचण येऊ शकते,असा अंदाज दिलीप कुमार यांना होता. त्यामुळेच त्यांनी पत्नीने दिलेल्या धमकीचा उल्लेख अर्जात केला असावा, असे वाटते.