bjp flag on gandhi idol

पलक्कड(palakkad) येथील महानगरपालिकेच्या इमारतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा(bjp flag on mahatma gandhi idol) गुंडाळलेला दिसून आल्यानंतर अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पलक्कड: पलक्कड(palakkad) येथील महानगरपालिकेच्या इमारतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यावर भाजपाचा झेंडा(bjp flag on mahatma gandhi idol) गुंडाळलेला दिसून आल्यानंतर अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीपीआयची युवा शाखा डीवायएफआयने या घटनेविरूद्ध मोर्चा काढला आणि पुतळ्यास हार अर्पण केले. काँग्रेस आणि युवा संघटनांनीही स्वतंत्र मोर्चा काढला. या घटनेविरोधात काँग्रेसने शहरात अनेक मोर्चे काढले. त्यानंतर माकप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनासमोर आंदोलन करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

नगरसेवकांनी पाहिला ध्वज
काँग्रेस आणि सीपीएमच्या नगरसेवकांनी गांधीजींच्या पुतळ्यावर ध्वज पाहिल्याचे सांगण्यात आले. यानंतर मोठ्या संख्येने लोक तिथे पोहोचले. लोकांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली आणि त्याविरोधात कारवाईची मागणी केली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गांधीजींच्या पुतळ्यावरून ध्वज हटविला. सीपीएम आणि काँग्रेसचे कार्यकर्ते तेथे तिरंगा दाखवत होते.

भाजपाचे विरोधकांवर आरोप
या संपूर्ण प्रकरणात भाजपाने हात वर केले असून विरोधकांवरच कट रचल्याचा आरोप केला. काही दिवसांपूर्वी असाच वाद निर्माण झाला होता. नगरसेवकांच्या इमारतीत भाजपा कार्यकर्त्यांनी दोन मोठे बॅनर लावले होते. त्यापैकी एकावर जय श्री राम लिहिलेले होते. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी काही भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली होती.