भाजपा नेते निलेश राणेंना कोरोनाची लागण

माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाली असून स्वत: त्यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर कोरोनाची चाचणी करून घेतल्यावर रिपोर्ट  पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले. 

‘कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.”असे राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.