mahavitran

वसई: महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेच्या व वीज महावितरण(mahavitran) कंपनीच्या अनागोंदी कारभाराविरोधात भारतीय जनता पार्टीने ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बिजली आंदोलन आयोजित केले आहे. वसई पूर्व येथे अधीक्षक अभियंता कार्यालय महावितरण कंपनीच्या समोर ४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपाने आंदोलन आयोजित केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियतेमुळे सामान्य जनता पूर्णपणे हतबल झाली आहे.

निष्क्रिय ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील जनतेसाठी कुठलेच पॅकेज अद्यापपर्यंत घोषित केलेले नाही. त्यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत व त्यात आणखीन वीज कंपनीने भरमसाठ वीज बिले जनतेच्या माथी मारून एक प्रकारे नागरिकांचे आर्थिक शोषण चालविले आहे. त्यामुळे जनता त्रस्त असून दिलासा नाही. महावितरणाच्या अनागोंदी कारभाराविरोधात व ३०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याची आणि एप्रिलपासून लागू झालेले युनिट दर कमी करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे वसई पूर्व मंडळ अध्यक्ष अश्विन सावरकर, सरचिटणीस विकास सिंह ठाकुर व विवेक भोसकर यांच्या नेतृत्वाखाली वसई पूर्व येथील महावितरण कार्यालयजवळ ४ सप्टेंबर रोजी सकाळी बिजली आंदोलन होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.