‘उद्धवा अजब तुझे सरकार..’ भजन गाऊन भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन

वाडा: पालघर जिल्ह्यात मंदिरे खुली करण्यासाठी आज भाजप जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्याकडून विक्रमगड तालुक्यातील कोकणी पाडा येथे राधा कृष्ण मंदिरात राज्य सरकार विरोधात भजन गाऊन आंदोलन करण्यात आले. जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी स्वतः पखवाज वाजवून उद्धवा अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार
असे भजन कार्यकर्त्यांनी गाऊन या मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय विरोध यावेळी केला गेला. त्याचप्रमाणे मनोर येथील गावदेवी मंदिरात भाजपचे संघटन सरचिटणीस संतोष जनाठे यांच्यासह कार्यकर्त्यांनी घंटानाद केला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपने मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन केले.