भाजपचे आंदोलन म्हणजे पुतना मावशीचे प्रेम, राजू शेट्टींची टीका

आज भाजपने पुकारलेल्या दूध दरवाढीविरोधातील आंदोलनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे. भाजपने पुकारलेले हे आंदोलन म्हणजे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. 

राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, भाजपला दूध दरवाढीवरून आंदोलन करण्याचा अजिबात अधिकार नाही. कारण भाजपच्या काळात दूध उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आला होता. फक्त राज्य सरकारविरोधात भाजप आंदोलन करत असेल तर ही दूध उत्पादकांची फसवणूक आहे, असेही शेट्टी म्हणाले.