bus ticketing machine

परिवहन मंत्र्यांच्या निर्देशावरूनच निविदेच्या अटीशर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचा(st ticket vending machine scam) आरोप कोटेचा यांनी केला. यासाठी निविदेच्या अटीमध्येही परिवर्तन करण्यात आले, असे ते म्हणाले. त्यामुळे महामंडळाला जवळपास २५० कोटींचे नुकसान होऊ शकते,असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

    मुंबई: राज्य रस्ते परवहन महामंडळात (एसटी) इलेक्ट्रॉनिक तिकिट मशीन खरेदी प्रकियेत परिवहन मंत्र्यांच्या भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत निविदा प्रक्रिया त्वरित रोखण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. राज्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा राज्य कोषाध्यक्ष आणि आमदार मिहिर कोटेचा यांनी या निविदा प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.

    मंत्र्यांकडेच प्रलंबित
    इलेक्ट्रॉनिक तिकिट मशीन खरेदी करणे आणि संगणीकृत आरक्षण व्यवस्थेकरीता निविदा मागविण्यासाठी महामंडळाने २००८ पासून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या कंत्राटदारास हे काम देण्यात आले आहे त्याची मुदत जून २०२१मध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे निविदा मागविण्याचा प्रस्ताव २४ जुलै २०२० रोजी परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी आणण्यात आला होता. निविदेला मंजुरी देण्यासाठी हा प्रस्ताव परिवहन मंत्र्यांकडे पाठविण्यात आला परंतु त्यांनी तो प्रलंबित ठेवला, असे ते म्हणाले.

    परिवहन मंत्र्यांच्या निर्देशावरूनच निविदेच्या अटीशर्तींमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप कोटेचा यांनी केला. यासाठी निविदेच्या अटीमध्येही परिवर्तन करण्यात आले, असे ते म्हणाले. त्यामुळे महामंडलाला जवळपास २५० कोटींचे नुकसान होऊ शकते,असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान निविदा प्रक्रिया न रोखल्यास न्यायालयाचे दार ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.