मंदिरे उघडण्यासाठी भाजपचं राज्यभर शंखनाद आंदोलन, भाजपचेच नेते करतायत केंद्र सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन

एकिकडे तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून धार्मीक सणांमधे आवर घालण्याचे केंद्राने संकेत दिले असताना, आणि राज्य सरकार रात्रींची संचारबंदी करण्याच्य विचारत असताना, दुसरीकडे मात्र मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भाजपचेच नेते केंद्राच्या निर्देशांना हरताळ फासत असल्याचं पाहयला मिळत आहे.

    मुंबई – ‘राज्य सरकार हिंदू विरोधी असून त्यांनी दारुची दुकने, बियर बार सुरु केले. पंरतु आमच्या हिंदू देवतांना कुलुपंबद ठेवले आहे.’ असा राज्य सरकारवर आरोप करत भाजपने ठिकठिकाणी शंखनाद आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली. कोरोनामुळं राज्यातील मंदिरं बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली.

    राज्यातील विविध भागात भाजपाने आज आंदोलन केले. शिर्डीत भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीमाता मंदिरासमोर आंदोलन केलं. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी मंदिर लवकरात लवकर उघडावीत अशी मागणी केली.

    पुण्यात कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेला दोन साथीदार असे मिळालेत ज्यांचा देवावर विश्वास नाहीय. अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी असं करावं लागतंय. खुर्ची टिकवण्यासाठी आणि दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी सरकार मंदिरं खुली करत नाहीय. लॉकडाऊनचे नियम सर्वांना सारखे पाहिजेत. दारू घरी पोहचवतात. पण सोबत असणाऱ्या दोन्ही पक्षांना खुश करण्यासाठी मंदिरं खुली केली जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

    मुंबईत आंदोलन करताना राम कदम म्हणाले की, हे हिंदू विरोधी सरकार आहे त्यामुळे मंदिरं उघडली जात नाहीत. विशेष म्हणजे दारूच्या दुकानांना परवानगी आहे. आम्ही गर्दी करा म्हणत नाहीत. जे नियम दारूचे दुकानं उघडण्यासाठी लावले आहेत त्यांना परवानगी आहे. मग मंदिरांबाबत देखील नियमावली करून परवानगी द्या. दोन डोस पूर्ण झालेत त्यांना तरी परवानगी द्या. दुसऱ्या धर्माच्या लोकांनी परवानगी मागितली तर रात्री मंत्रालय उघडून परवानगी दिली जाते.

    पारंपरिक पद्धतिने दहीहंडी साजरी करण्यावर देखील यांनी बंदी घातली आहे. मात्र उद्या आम्ही दहीहंडी साजरी करणार आहोत. हिंदू धर्म सडका म्हणणाऱ्यांना हे अटक करत नाहीत आणि मंदिर उघडण्यासाठी देखील हे परवानगी देत नाहीत. हिंदू विरोधी हे सरकार आहे. सामाजिक अंतर राखून, नियमांसहित ठराविक लोकांना तरी परवानगी द्या. शिर्डी, सिद्धिविनायक याबाबत नियम करून तरी परवानगी द्या. लोकल प्रवासासाठी जे नियम लावले आहेत ते लावा आणि परवानगी द्या, हिंदूविरोधी काँग्रेस सोबत तुम्ही बसला आहात त्यामुळे तूम्ही परवानगी देत नाहीत. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी तुमची हतबलता आम्हाला पाहिला मिळत आहे, असं राम कदम म्हणाले.

    सरकारचे निर्बंध आता पाळणार नाही, बिअर बार हॉटेल मॉल सुरू केले. मग मंदिर बंद का? असा सवाल करत आज बीड भारतीय जनता पार्टीच्या वतीने, मंदिर उघडण्यात यावी यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आलं. यावेळी बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र बेलेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडून आत प्रवेश केला.

    एकिकडे तिसऱ्या लाटेची खबरदारी म्हणून धार्मीक सणांमधे आवर घालण्याचे केंद्राने संकेत दिले असताना, आणि राज्य सरकार रात्रींची संचारबंदी करण्याच्य विचारत असताना, दुसरीकडे मात्र मंदिरं उघडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत भाजपचेच नेते केंद्राच्या निर्देशांना हरताळ फासत असल्याचं पाहयला मिळत आहे.