आणखी काही दिवस घरी बसण्याची तयारी ठेवा, ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात असलेले निर्बंध १५ मे पर्यंत पाळावे लागणार – नवा आदेश जारी

राज्य सरकारने १ मे २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’(break the chain) टाळेबंदी निर्बंधाना (lockdown till 15 th may)राज्य सरकारने १५ मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

    मुंबई: राज्य सरकारने १ मे २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक द चेन’(break the chain) टाळेबंदी निर्बंधाना (lockdown till 15 th may)राज्य सरकारने १५ मे च्या सकाळी सात वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबत काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली होती. मात्र हे निर्बंध किती दिवस वाढवायचे याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री पातळीवर घेण्यात येणार होता. त्यानुसार आज मुख्य सचिवांनी १५ मे पर्यंत टाळेबंदी निर्बंधांना मुदतवाढ देत असल्याचे आदेश जारी केले.

    अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते  ११ वाजेपर्यंतच सुरु

    राज्यात कोरोना कोविड-विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी १४ एप्रिल पासून ब्रेक द चेन अंतर्गत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा बंदी आणि आंतर जिल्हा वाहतूकीवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. या मध्ये अत्यावश्यक सेवा आणि कोरोना कामा व्यतिरिक्त वाहतूकीला मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील लोकल सेवां सहीत राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक मंदावली आहे. हे निर्बंध आणखी १५ दिवस लागू राहणार आहेत. राज्यात व्यापारी आणि व्यावसायिकांनी या निर्बंधाना सुरूवातीला विरोध केला होता. त्यानंतर अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

    आणखी १५ दिवस निर्बंध
    कठोर निर्बंधानंतर मुंबईसह राज्यात कोरोनाच्या बाधीत रूग्णांची संख्या हळू हळू कमी होताना दिसत असून ब्रेक द चेन साठी टाळेबंदी निर्बंधाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मात्र गाफिल न राहता राज्यातील आरोग्य सेवांवरील ताण कमी करण्यासाठी किमान आणखी १५ दिवस हे निर्बंध पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.