पंतप्रधानांना एका तासात ठार करण्याबाबत पोलिसांना फोन, नक्की काय आहे प्रकरण?

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार करण्याबाबत पोलिसांना फोन आला. या फोनमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणाचा शोध घेतला असता हा फोन नोएडा येथील एका व्यक्तीने दारूच्या नशेत केल्याचे समोर आले.

उत्तर प्रदेश : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार करण्याबाबत पोलिसांना फोन आला. या फोनमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणाचा शोध घेतला असता हा फोन नोएडा येथील एका व्यक्तीने दारूच्या नशेत केल्याचे समोर आले. या व्यक्तीनं पोलिसांना १०० क्रमांकावर फोन करून एक तासाच्या आत पंतप्रधान मोदींना गोळ्या घालून ठार करेन अशी धमकी  दिली होती. या व्यक्तीचा फोन ट्रॅक करून त्याला पोलिसांनी अटक केली.

गुन्हा केलेल्या व्यक्तीने आधी लखनऊ पोलिसांना फोन केला. या फोन नंतर  लखनऊ पोलिसांनी लगेचच नोएडा पोलिसांना याबाबत माहिती दिला. या इसमाचा फोन ट्रॅक करत त्यांनी आरोपीला मामूरा गावातून अटक केली. सध्या पोलीस या इसमाची चौकशी करत असून, त्याचा अटक करण्यात आली तेव्हा तो दारूच्या नशेत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या व्यक्तीचे नाव  हरभजन सिंग असून वय ३३ वर्ष आहे. अटकेच्या वेळी दारूच्या नशेत होता आरोपी मुळचा हरियाणाचा असलेला आरोपी सध्या नोएडाच्या सेक्टर -६६ मध्ये राहत होता. त्यांच्याकडे चौकशी केली जात असल्याचे पोलिस उपायुक्त म्हणाले. त्याने असा फोन का केला याबाबत चौकशी केली जात आहे. तसेच, अटकेच्या वेळी आरोपी नशेत होता, असेही पोलिसांनी सांगितले.