banner on pallakad corporation

छत्रपती शिवाजी महाराज(chatrapati shivaji maharaj banner) यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम(jay shreeram) असा मजकूर लिहिलेला बॅनर महापालिकेच्या इमारतीवर झळकवल्या प्रकरणी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज(chatrapati shivaji maharaj banner) यांचा फोटो असलेला आणि जय श्रीराम(jay shreeram) असा मजकूर लिहिलेला बॅनर महापालिकेच्या इमारतीवर झळकवल्या प्रकरणी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. केरळ राज्यातील पलक्कड(pallakad) शहरात ही घटना घडली आहे. पलक्कडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपाने ५२ पैकी २८ वॉर्ड्समध्ये विजय मिळाला  हा विजय साजरा करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो आणि जय श्रीराम लिहिलेले बॅनर लावले. त्यानंतर केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पलक्कड पालिकेच्या निवडणुकीत भाजपाचा विजय झाला. बुधवारी काही कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला मोठा बॅनर पालिकेच्या इमारतीवर लावला. त्या बॅनरवर मल्याळम भाषेत जय श्रीराम लिहिलं होतं. त्यानंतर पलक्कड महापालिकेचे सचिव यांनी भाजपा कार्यकर्त्यांविरोधात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बॅनरसोबतच कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो असलेले बॅनरही झळकावले होते. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.