Local service on Trans Harbor route disrupted, pantograph-overhead wires intertwined nrsj

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेला आतापर्यंत तब्बल १ हजार २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये या दोन्ही विभागांच्या तिजोरीत फक्त ५२ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनाच्या(corona)पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे(lockdown) पश्चिम आणि मध्य उपनगरीय रेल्वेला आतापर्यंत तब्बल १ हजार २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये या दोन्ही विभागांच्या तिजोरीत फक्त ५२ कोटी रुपये जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.

कोरोनामुळे २२ मार्चपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा बंद होती. आधी फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे धावत होती.  कालांतराने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. आता महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. सर्वसामान्यासाठी मात्र अजून लोकल सेवा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेला नुकसान सहन करावे लागत आहे. या नुकसानाचा आकडा आता एक हजार कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.

दरवर्षी एप्रिल ते नोव्हेंबरच्या काळात मध्य रेल्वेला उपनगरीय सेवेतून साधारणपणे ५०२ कोटी रुपये प्रवासी उत्पन्न मिळते. यंदा या कालावधीत फक्त २२ कोटी मिळाले आहेत. रेल्वेला ४८० कोटींचा तोटा झाला आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकल फेऱ्या सुरु आहेत. मात्र प्रवासी संख्या ६ लाखच आहे.

पश्चिम रेल्वेलाही गेल्या आठ महिन्यांत ३० कोटी ६५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तर ५४० कोटी ९ लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील ६ लाख ४२ हजार ५०१ प्रवासी प्रवास करत असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकल फेऱ्या सध्या धावतात.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सध्या दररोज २७८१ लोकल फेऱ्या धावतात. यात मध्य रेल्वेवरील १५८० (टाळेबंदीआधी १७०० पेक्षा जास्त फेऱ्या) आणि पश्चिम रेल्वेवरील १२०१ फेऱ्यांचा (टाळेबंदीआधी १३६७ फेऱ्या) समावेश आहे.  या दोन्ही मार्गावर दर दिवशी एकूण ८० लाख प्रवासी प्रवास करत होते. आता हीच संख्या १२ लाखांच्या आसपास आहे.