central railway

मध्य रेल्वेने १० प्रवाशी गाड्या(central railway cancelled 10 trains till 10th may) उद्या म्हणजे २७ एप्रिलपासून १० मे २०२१ पर्यंत रद्द केल्या आहेत. मात्र गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या गाड्यांना लोकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे.

  मुंबई : राज्यामध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अनेक गोष्टींवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. अशातच मध्य रेल्वेने १० प्रवासी गाड्या उद्या म्हणजे २७ एप्रिलपासून १० मे २०२१ पर्यंत(10 trains cancelled till 10 th may) रद्द केल्या आहेत. मात्र गाड्या तोट्यात चालत असल्याने रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. या गाड्यांना लोकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे.

  रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये मनमाड -मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी- मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर – पुणे, दादर -शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अन्य गाड्यांचा समावेश आहे.

  रद्द करण्यात आलेल्या गाड्या

  १).ट्रेन क्रमांक ०२१०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेषच्या फेऱ्या २७ एप्रिलपासून १० मे पर्यंत रद्द
  २) ट्रेन क्रमांक ०२११० मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेषच्या फेऱ्या २७ एप्रिलपासून १० मे पर्यंत रद्द
  ३)ट्रेन क्रमांक ०२११३ पुणे -नागपूर विशेषच्या फेऱ्या २८ एप्रिलपासून १० मे पर्यंत रद्द
  ४)ट्रेन क्रमांक ०२११४ नागपूर -पुणे विशेषच्या फेऱ्या २७ एप्रिलपासून ९ मे पर्यंत रद्द
  ५)ट्रेन क्रमांक ०२१८९ मुंबई -नागपूर विशेषच्या फेऱ्या २८ एप्रिलपासून ११ मे पर्यंत रद्द
  ६)ट्रेन क्रमांक ०२१९० नागपूर -मुंबई विशेषच्या फेऱ्या २७ एप्रिलपासून १० मे पर्यंत रद्द
  ७) ट्रेन क्रमांक ०२१११मुंबई -अमरावती विशेषच्या फेऱ्या २८ एप्रिलपासून ११ मे पर्यंत रद्द
  ८) ट्रेन क्रमांक ०२११२ अमरावती मुंबई विशेषच्या फेऱ्या २७ एप्रिलपासून १० मे पर्यंत रद्द
  ९) ट्रेन क्रमांक ०२२७१ मुंबई -जालना विशेषच्या फेऱ्या २७ एप्रिलपासून १० मे पर्यंत रद्द
  १०) ट्रेन क्रमांक ०२२७२ जालना -मुंबई विशेषच्या फेऱ्या २८ एप्रिलपासून ११ मे पर्यंत रद्द