chagan Bhujbal

मराठा आरक्षण(maratha reservation) शरद पवारांमुळे(sharad pawar) मिळालं नाही असं म्हणणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ(chagan bhujbal) यांनी विचारला आहे. भुजबळ यांनी हा प्रश्न विचारून उदयनराजेंचं नाव न घेता टोला लगावला आहे.

मराठा आरक्षण(maratha reservation) शरद पवारांमुळे(sharad pawar) मिळालं नाही असं म्हणणाऱ्या खासदारांचा अभ्यास काय? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ(chagan bhujbal) यांनी विचारला आहे. भुजबळ यांनी हा प्रश्न विचारून उदयनराजेंचं नाव न घेता टोला लगावला आहे. इतकंच नाही तर मराठा आरक्षणावरुन भाजपाचं पडद्यामागचं राजकारण सुरु आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा नसतो. घटनेनुसार ते मिळत असतं. मात्र शरद पवारांवर आरोप करणाऱ्या खासदारांचा त्यावर अभ्यास नाही त्यामुळे ते शरद पवारांवर टीका करत आहेत, असं भुजबळांनी म्हटलं आहे.

९ डिसेंबरला मराठा आरक्षणाला सप्टेंबर महिन्यात मिळालेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. त्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर परत टीका करण्यास सुरुवात केली. यावर छगन भुजबळ यांनी भाजप पडद्याआडून राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.  ज्या पक्षाच्या खासदारांनी शरद पवारांवर मराठा आरक्षण प्रकरणी टीका केली त्यातून भाजपाचा हेतू काय ते उघड होतं असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.