rain

सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा(low pressure belt) पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.पुढील  पाच दिवस (rain in maharashtra for next 5 days) राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

    मुंबई :राज्यातील तापमानाचा(Temperature in Maharashtra) पारा पुन्हा चढू लागताच, राज्यातील ढगाळ वातावरणामुळे(cloudy weather)  तापमानात घट झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

    गेल्या तीन दिवसांमध्ये सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं(Nonseasonal Rain In Maharashtra) आहे. पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही  झाली आहे.मात्र राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर झालेल नाही.

    सध्या पश्चिम विदर्भ ते दक्षिण तामिळनाडू आणि कर्नाटक या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. शिवाय दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी राज्यात अनेक ठिकाणी पूर्व मोसमी पाऊस पडत आहे. पुढील  पाच दिवस राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

    सध्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिणेकडील इतर प्रदेशात अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे याठिकाणी पुढील पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्राला पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसू शकतो. याठिकाणी विजांच्या गडगडासह सोसाट्याच्या वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात एक ते दोन ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.आठवड्याच्या शेवटी मुंबईतही अवकाळी पाऊस धडकू शकतो.