चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना करुन दिली ‘त्या’ घटनेची आठवण,म्हणाले ‘ तेव्हा आमदार सांभाळले असते तर….’

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार(ajit pawar) यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच भाजपातून महाविकास आघाडीत येणाऱ्यांना पुन्हा निवडून आणू, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला होता. त्याला चंद्रकांत पाटील(chandrakat patil) यांनी उत्तर दिले आहे.

अजित पवारांना सोबत घेऊन दुसऱ्यांदा सत्तेत आलेलं फडणवीस सरकार काही तासांतच कोसळलं होतं. ही बाब भाजपा नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्यांचं वारंवार दिसून आलं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानातून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेची आठवण करुन दिली. “अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते, तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं ठरलं नसतं,” असं म्हणत चंद्रकातं पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

“जे कुणी भाजपचा व आमदारकीचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीत येतील त्यांना तिन्ही पक्ष मिळून निवडून आणण्याचा प्रयत्न करतील,” असं अजित पवार म्हणाले होते.त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.