‘उद्धवजी आणि पवार साहेब हे कोणत्या प्रकारचं राजकारण आहे ?’-बसवरचा भगवा काढायला लावल्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती”.

हिवाळी अधिवेशनाच्या(winter session) पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी मुंबईत आंदोलन(protest in Mumbai) छेडण्याचे ठरवले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांनी अडवलं. सकाळपासूनच मुलुंड आणि मानखुर्द येथे पोलीस बंदोबस्त दिसून आला.  यावेळी एका बसवरील भगवा झेंडा काढण्यात(orange flag removed from bus) आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil) यांनी संताप व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती”.

मराठा आरक्षणावरून मराठा संघटनांनी शहरात जोरदार आंदोलन करण्याचे ठरवलं होतं. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या संघटनांकडून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात येण्याची शक्यता होती. यामुळे सोमवारी सकाळपासून ठाणे, मुलुंड आणि मानखुर्द टोलनाका परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांना थांबवून पोलीस या वाहनांची तपासणी करत होते. या नाकाबंदीमुळे वाहतूक कोंडी झाली होती.