chandrakant patil and dhanajay munde

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(dhananjay munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil)यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे(dhanajay munde) यांच्यावर रेणू शर्मा(renu sharma) या महिलेनं बलात्काराचा(rape) आरोप केले आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(chandrakant patil)यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.


चंद्रकांत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आम्हीही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर अशा प्रकारचे आरोप होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. मात्र, गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असं वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे.”

दरम्यान, भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.