‘अनिल देशमुख राजीनामा द्या, संजय राऊतांना गृहमंत्री करा’ – चंद्रकांत पाटील यांची मागणी

शिनवेसेनेत संजय राऊत बोलणारे आहेत. मंत्रीमंडळातला कोणता नेता बोलणारा नाही, त्यामुळे संजय राऊतांना मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील(chadrakant patil demand) यांनी केली आहे.

    मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी सध्या पोलीस अधिकारी सचिन वाझे एनआयएच्या कोठडीत आहेत. दोन तपास यंत्रणाकडून तपास सुरु आहे. सत्य बाहेर येत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिनवेसेनेत संजय राऊत बोलणारे आहेत. मंत्रीमंडळातला कोणता नेता बोलणारा नाही, त्यामुळे संजय राऊतांना मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील(chadrakant patil demand) यांनी केली आहे.

    दरम्यान सचिन वाझे प्रकरणावर भाजप सरकार महाविकास आघाडी सरकारवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. NIA ने सचिन वाझे यांना ताब्यात घेतल्यामुळे रोज नवनवीन पुरावे हाती लागत आहेत. दोन तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहे. शोध लागला आहे, आता बुरखे फाटायला वेळ लागणार नाही. कोण कोण पायाखाली येतंय हे रात्रीपर्यंत बाहेर येईल. अशा शब्दात पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

    जे घडले त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांची जबाबदारी आहे. त्यामळे अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी, मागणी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेचं पोलीस अधिकारी यांच्या गाडीत स्फोटकं सापडली, पैसे सापडले, पैसे मोजण्याची मशीन सापडते, हे गंभीर असल्याचं पाटील म्हणाले.