राजकारण संपलं असेल तर कोरोनाच्या विरोधातील लढाईकडे लक्ष देऊया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लगावला टोला

पश्चिम बंगालमधील (Assembly Elelction 2021)विजयानंतर देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thakre)ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.

    पश्चिम बंगालमधील (Assembly Elelction 2021)विजयानंतर देशभरातून ममता बॅनर्जी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thakre)ममता बॅनर्जींचं अभिनंदन केलं आहे.

    उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, “ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्याच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय या वाघिणीलाच द्यावे लागेल”.

    ते पुढे म्हणाले, “पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारं ममतादीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममतादीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचे मनापासून अभिनंदन करतो”.

    दरम्यान आता राजकारण संपले असेल तर सर्वांनी मिळून करोनाविरोधातील लढाईकडे लक्ष देऊया, असं मत उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.