सामान्या जनतेच्या सुविधांकडेही नगरविकास विभागाने लक्ष द्यावे – साळवे

कल्याण : महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने फक्त बिल्डर लॉबीकडेच लक्ष न देता सामान्य जनतेच्या सुविधांकडेही(facility) लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी सचिव नोवेल साळवे(novel salwe) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre आणि उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांच्याकडे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका(kalyan dombivali municipal corporation)  प्रशासनाने महापालिकेतून १८ गावे वगळून त्यांच्या सर्व कायदेशीर प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली होती. त्यात नवीन बिल्डिंग व बांधकामाचाही समावेश होता. आता नगरविकास विभागाने बिल्डर लॉबीला सहानुभूती दाखवत कल्याण महापालिका प्रशासनाला आदेश दिले आहेत की, या १८ गावांमधील विकासकांना विकास कामे करण्यासाठी परवानगी द्यावी. मात्र अशी सहानुभूती नगरविकास विभागाने इथल्या सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर दाखवली नाही.

काही दिवसांपूर्वी कल्याण महापालिका प्रशासनाच्या उद्धट व गलथान कारभाराविरोधात नागरी हक्क संघर्ष समितीतर्फे भर पावसात भिजून काही समाजसेवकांनी आंदोलन केले होते. त्या वेळेस नगरविकास विभागाने दखल घेतली नाही. कल्याण महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेशी निगडित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यावर लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प आहेत. सध्या महापालिकेच्या निवडणूका समोर बघून बहुतेक लोकप्रतिनिधी व इच्छुक उमेदवारांनी उठाठेव सुरू केली आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्न तसेच आहेत. ज्यावर कल्याण महापालिका प्रशासन आजिबात गंभीर नसल्याचा आरोप नोवेल साळवे यांनी केला आहे.

कल्याण महापालिका प्रशासनाने २०१८ साली स्मार्ट सिटीच्या नावाखाली काही सार्वजनिक शौचालय व मुतारी तोडली होती, वारंवार निवेदन देऊनसुद्धा ती परत बांधली गेली नाही. नागरिकांचे असे अनेक प्रश्न आहेत, त्यावर आता कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे नगरविकास विभागाला नागरिकांच्या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्यासाठी सुचना द्याव्यात, अशी मागणी नोवेल साळवे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.