ram mandir murti

भोपाळ: राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निधी उभारणीसाठी मोहीम हाती घेतली असताना काँग्रेसनेसुद्धा निधी उभारणीच्या(fund collection for ram mandir कार्यक्रमात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे.

भोपाळ: राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी निधी उभारणीसाठी मोहीम हाती घेतली असताना काँग्रेसनेसुद्धा निधी उभारणीच्या(fund collection for ram mandir कार्यक्रमात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राम मंदिर उभारणीसाठी जमेल तेवढा निधी देण्याची विनंती करणारे पोस्टर्स राजीव गाधींच्या फोटोसह झळकले आहेत.

पोस्टर्स झळकले
भारतीय जनता पार्टी आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिरासाठी निधी जमवणे सुरु केले आहे. त्यासाठी देशभरात विशेष मोहीम राबवली जातेय. त्यानंतर आता काँग्रेससुद्धा राम मंदिरासाठी स्वतंत्रपणे निधी उभारत आहे. मध्य प्रदेशमध्ये त्या आशयाचे पोस्टर्स झळकले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या जवळचे म्हटले जाणारे आमदार पी. सी. शर्मा यांनी निधी उभारणी सुरु केली आहे.

पोस्टरवर राजीव गांधींचा फोटो
भोपाळमधील न्यू मार्केटमधील हनुमान मंदिरासमोर आमदार पी. सी. शर्मा यांनी राम मंदिरासाठी निधी संकलनाचे काम सुरू केले आहे. यासाठी त्यांनी राजीव गांधी यांचा १९८९ मधील फोटोचा वापर केला. या फोटोमध्ये १९८९ साली राजीव गांधी अयोध्या येथील राम मंदिराचे भूमिपूजन करताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये राम मंदिर ट्रस्टचा बँक अकाऊंट नंबरसुद्धा दिलेला आहे. या अकऊंटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी निधी द्यावा करावे असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. पोस्टरवर ‘राजीव गांधी जी का सपना हो रहा साकार राम मंदिर ले रहा आकार’, ‘मंदिर निर्माण में हाथ बढ़ाएं, आओ प्रभु राम का घर सजाएं.’ असे हिंदीमध्ये लिहलेले आहे.